राज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा
देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य-ANI)

राज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घोषणा केली आहे. येत्या 24 जूनला राज्यातील काही साहित्यिक हे आझाज मैदानावर आंदोलन करणार असून प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवावी अशी मागणी करणार आहेत.

सीबीएससी आणि आयसीएसी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. त्यामुळे कायद्याअंतर्गत बदल करुन मराठी भाषा न शिकवल्यास त्या शाळेवर कारवाई करण्यात यावी असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असून ती शिकवावी असे सुद्धा मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

(फडण.. दोन.. शून्य म्हणजे फडणवीस; उर्जामंत्री बावनकुळे ऐवजी पन्नास... दोन कुळे असं म्हणायचं का? अजित पवार यांचा सवाल)

तर मराठी शाळांचा दर्जा सुधारणे, मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करणे असे विविध मुद्दे पावसाळी अधिवेशनात मंजुकरावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी मराठी भाषेबाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणीवस यांनी त्याबद्दल आदेश दिले आहेत.