Cloud Seeding in Maharashtra: औरंगाबाद मध्ये कृत्रिम पावसाची चाचणी पूर्ण
Cloud Seeding In Aurangabad (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरात पावसाचं थैमान सुरू असताना मराठवाडा आणि विदर्भातील काही काहीअद्याप पावसाच्या प्रतिक्षेत आहे. या ठिकाणी शेतकर्‍यांची चिंता मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कृत्रिम पावसासाठी प्रयत्न सुरू आहेत. काल औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसासाठी मेघबीजारोपण करण्यासाठी चाचणीकरिता विमान झेपावल्यची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्याचा फायदा कितपत होईल याबाबत पुढील काही दिवसात माहिती मिळेल.

क्लाऊड सिडींग मिशनच्या डायरेक्टर कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या पश्चिम भागामध्ये सुमारे 40 किमी भागात कृत्रिम पावसासाठी मेघ बीजारोपण करण्यात आले आहे. ढगांची स्थिती अनुकूल नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचा फायदा होऊन किती पाऊस पडू शकतो याची माहिती लवकरच मिळेल.

ANI Tweet

सध्या जायकवाडी जलाशयात 71 हजार 335 क्यूसेक वेगाने नाशिकमधील पुराचे पाणी दाखल होत आहे. धरणाची टक्केवारी दर दोन तासाला वाढत आहे. मराठवाडय़ात अपेक्षेप्रमाणे अद्याप मुसळधार पाऊस न झाल्याने अजूनही पाणीटंचाई आहे. उस्मानाबाद, लातूर, बीडचा काही भाग येथे तीव्र पाणीटंचाईची आहे. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामध्ये वृद्धी व्हावी म्हणून मेघ बीजरोपण केले जात आहे.