चुनाभट्टी: मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाकडून तरुणीला धडक दिल्याने मृत्यू

यामध्ये सदर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबईतील चुनाभट्टी येथे शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने पादचारी रस्त्यावरुन चालणाऱ्या तरुणीला धडक दिल्याचा प्रकार घडला. यामध्ये सदर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र जो पर्यंत तरुणीच्या दोषींवर तत्काळ कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे घरातील मंडळींनी पोलिसांकडे स्पष्ट केले आहे.

चुनाभट्टी येथे रात्री 8.45 वाजताच्या दरम्यान अर्चना तिच्या मैत्रीणींसोबत फुटपाथवरुन चालत होती. त्यावेळी अचानक पाठून आलेल्या भरधाव कारने अर्चना हिला जोरदार धडक देत ती कार पुढे निघून गेली. यामध्ये अर्चना हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अर्चना हिच्या मैत्रीणींना धक्का बसला आहे. तर अर्चना हिच्या घरातील मंडळींनी या प्रकरणी संताप व्यक्त केला असून मुलीच्या निधनाने त्यांच्यावर मोठे दुख ओढावले आहे.

या प्रकरणी भरधाव वेगाने आलेल्या कारमध्ये एकूण चार जण होते. त्यामधील चालक हा मद्यधुंद असल्याने त्याने अर्चना हिला धडक दिली. यामध्ये तिचा मृत्यू झाल्याने चुनाभट्टी येथील नागरिक आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला घरातील मंडळींनीसुद्धा आरोपींना शिक्षा द्या तरच मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊ असे स्पष्ट केले आहे.(धक्कादायक! गर्भापात करुन 5 महिन्याचे अर्भक नदीत फेकले; अनैतिक संबधातून कुमारी मातेने नवजात बाळाला जन्म दिल्याची शक्यता)

 तर कांदिवली येथील लालजी पाडा परिसरात असलेल्या जय भारत कॉम्पलेक्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली फेकल्याची  घटना गुरुवारी घडली. उंचावरुन जमीनीवर आपल्याने अर्भकाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मात्र, प्राथमिक माहिती अशी की, बाथरुमच्या खीडकीतून हे अर्भक खाली फेकण्यात आले.