Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला
CM Devendra Fadanvis, Uddhav Thackeray (Photo Credits: File Image)

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काही दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज (11 मे) राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिले जावे यासाठी राज्यपालांना निवदेन देण्यात आले आहे. तसेच, आता लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. यानंतर उद्धव ठाकरेन (Uddhav Thackeray) यांची पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रूफ होता तर, टिकला का नाही? असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.

सर्वोच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द ठरवला. त्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न सर्वांच्याच समोर उभा ठाकला आहे. या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी संभाव्य पर्यायांचा विचार करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण हे राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे कालच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज राजभवन येथे ही भेट पार पडली. हे देखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतली भेट

उद्धव ठाकरे यांनी टिकेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावर ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?” असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.