Lockdown पुन्हा लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह राजकीय मंडळी काय म्हणतात?
(CM Uddhav Thackeray with Ajit Pawar and Chhagan Bhujbal | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र आणि देशात आटोक्यात आलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोणताही धोका टाळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर हा मंडळींकडून पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लावावा अशी मागमी करण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावावा की नाही याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राज्य मंत्रीमंडळातील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मास्कचा वापर ढाल म्हणून करा- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, एकदा सुरु केलेली गोष्ट आपल्याला पुन्हा बंद करण्याची गरज नाही. पण, ती कायम सुरु रहावी यासाठी कोरोना व्हायरस या संकटाविरुद्ध आपल्याला ठामणे लढले पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. माक्स तर नेहमीच वापरला पाहिजे. वार केव्हाही करता येतो. पण आलेला वार अडविण्यासाठी ढाल हवी असते. कोरोना विरुद्धच्या लढाईत मास्क हिच आपली ढाल आहे. ही ढाल जर वापरली तर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही. (हेही वाचा, Bacchu Kadu, Nana Patole: बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग; घरातील दोघे COVID 19 पॉझिटीव्ह आल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले क्वारंटाईन)

सरकारला जनतेची साथ हवी- अजित पवार

कोरोना नियंत्रणात आणणे ही काही राज्य सरकारची एकट्याची जबाबदारी नाही. यात जनतेचे सहकार्य हवे. एकटे सरकार काहीही करु शकत नाही. कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशिल आहे. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांनाना जनतेनेही सहकार्य करायला पाहिजे. आज ग्रामिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे आयोजित केले जात आहेत. समारंभही साजरे होते आहेत. हे अत्यंत चिंताजनक असल्याचे अजित पवार म्हणाले.

..तर सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील- छगन भुजबळ

दरम्यान, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही लॉकडाऊन लागू करण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. लॉकडाऊन लावणे कोणालाही परवडणारे नाही. परंतू, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन योग्य पद्धतीने केले नाही तर राज्य सरकारला लॉकडाऊनबाबत कडक निर्णय घ्यावाच लागेल, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे