CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन? पोलिसांत तक्रार दाखल, अजित पवार यांच्याकडूनही दखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा औरंगाबाद (Aurangabad) दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर थेट पोलीस तक्रार झाली आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी नियम आणि कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच या तक्रारीत करण्यात आली आहे

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन? पोलिसांत तक्रार दाखल, अजित पवार यांच्याकडूनही दखल
Eknath Shinde | (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा औरंगाबाद (Aurangabad) दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर थेट पोलीस तक्रार झाली आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी नियम आणि कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच या तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद करण्याचा नियम आहे. आम्ही सर्वच जण पदावर असलो,नसलो तरी हा नियम पाळतो. मुख्यमंत्र्यांनीही तो पाळावा असा संकेत आहे. असे असतानाही मुख्यमंत्रीच जर असे काही करत असती तर काय बोलायचे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यांमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान हे आदेश धुडकावून लावले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तसेच, कायद्याचाही भंग झाला आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.  (हेही वाचा, Shiv Sena Mouthpiece Saamana on BJP: शिवसेना मुखपत्रातून भाजपवर शरसंधान, 'भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतेय')

आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार तक्रार दाखल केली आहे. कस्तुरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र, तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे पोलिसांनी म्हटल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

2%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80+%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A4%B2&body=Check out this link https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fmaharashtra%2Fchief-minister-eknath-shinde-violation-of-rules-complaint-filed-in-police-notice-from-ajit-pawar-too-392510.html" title="Share by Email">
महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन? पोलिसांत तक्रार दाखल, अजित पवार यांच्याकडूनही दखल
Eknath Shinde | (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा औरंगाबाद (Aurangabad) दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर थेट पोलीस तक्रार झाली आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी नियम आणि कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच या तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद करण्याचा नियम आहे. आम्ही सर्वच जण पदावर असलो,नसलो तरी हा नियम पाळतो. मुख्यमंत्र्यांनीही तो पाळावा असा संकेत आहे. असे असतानाही मुख्यमंत्रीच जर असे काही करत असती तर काय बोलायचे, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यांमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान हे आदेश धुडकावून लावले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तसेच, कायद्याचाही भंग झाला आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.  (हेही वाचा, Shiv Sena Mouthpiece Saamana on BJP: शिवसेना मुखपत्रातून भाजपवर शरसंधान, 'भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतेय')

आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार तक्रार दाखल केली आहे. कस्तुरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र, तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे पोलिसांनी म्हटल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change