माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन
Chandrashekhar Dharmadhikari (Photo Credits: Twitter)

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (Chandrashekhar Dharmadhikari) यांचे आज (गुरूवार) पहाटे तीन वाजता नागपूरमध्ये निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी शेवटचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते उपचारादरम्यान नागपूर रूग्णालयात त्यांचे निधन झाले.

चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यलढयामध्येही चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सहभाग घेतला होता. 1941 च्या सत्याग्रहामध्ये, 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना सुमारे तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

2003 साली चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा पद्मभूषण या पुरस्काराने गौरव झाला आहे. त्यांनी हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत दर्जेदार लिखाण केले आहे. आज सायंकाळी चारच्या सुमारास अंबाझरी घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील.