चंद्रपूर: प्रेमाला नकार दिला म्हणून बहिणीच्या नवऱ्याकडून मेव्हणीला मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
(प्रतिकात्मक प्रतिमा)

प्रेमाला नकार दाद दिली नाही म्हणून चुलत बहिणीच्या नवऱ्याकडून मेव्हणीला भररस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना चंद्रपूर (Chandrapur) येथील रामनगर (Ramnagar) परिसरात घडला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा विविहित असून तो गेल्या अनेक दिवसांपासून तो पीडितेला अनेकदा प्रपोज करायचा. परंतु, तिने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर 3 मार्च रोजी त्याने पुन्हा आपल्या पीडितेला रस्त्यात अडवून आपल्या प्रेमाची विचारणा केली. मात्र तिने त्याला चांगलेच खडसावले. यावर संतापलेल्या आरोपीने पीडितेला भररस्त्यात मारहाण केली. यानंतर पीडतेच्या कुटुंबियांनी आरोपीच्या विरोधात रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली.

बबलू देवराज जाधव असे आरोपी भाऊजीचे नाव असून गेल्या 2 वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यावेळी आपली पत्नी अल्पवयीन असल्याचे त्याला समजले. दरम्यान, बबलूचा त्याच्या पत्नीच्या चुलत बहिणीवर जीव जडला. ती देखील अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. बबलूने अनेकदा तिच्याकडे आपल्या प्रेमाची विचारणा करायचा. मेव्हणी जिल्हा क्रीडासंकुलात खो-खोचा सराव करायला जायची. हीच संधी साधून बबलू मंगळवारी तिथे पोहोचला. सायकलने जाणाऱ्या मेव्हणीला रस्त्यावर थांबवून पुन्हा प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याला चांगलेच खडसावले. यावर संतापलेल्या बबलूने तिला मारहाण केली. घरी पोहचल्यानंतर पडिताने सर्वप्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर सर्व कुटुंबीय रामनगर ठाण्यात पोहोचले आणि बबलू विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. बबलूला अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरु आहे. हे देखील वाचा- मध्य प्रदेशातील 'ऑपरेशन लोटस'च्या अयशस्वी प्रयत्नानंतर अशोक चव्हाण यांचा BJP ला खोचक टोमणा, पहा काय म्हणाले

महिलेवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र, महिलांवर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. यातच चंद्रपूर येथे घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पुन्हा महिला सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात लवकरच दिशा कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. या कायद्याअंतर्गत आरोपींना तातडीने शिक्षा देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.