मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, थोडा अभ्यास करत चला; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Chandrakant Patil (Photo Credits: Twitter/ ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील कोरोना स्थितीबाबत तसेच लॉकडाऊन बाबत बोलण्यासाठी काल फेसबुक लाईव्हमधून जनतेशी संवाद साधला. तर दुसरीकडे आजपासून पुण्यात सात दिवसांचा मिनी लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला. त्यामुळे लॉकडाऊनच्या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमकच झाले असून त्यांनी या मिनी लॉकडाऊन देखील कडकडून विरोध केला आहे. "लॉकडाऊन लावला तर आपलं अपयश झाकता येईल, असं या लबाड सरकारला वाटतं. पण या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार? याचा विचार आधी या सरकारने करायला हवा," अशी टिका भाजप नते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

गेल्यावर्षी झालेल्या मोठ्या लॉकडाऊन सावरलेला सामान्य नागरिक कुठे रुळावर येत होता त्यात आता पुण्यात झालेला मिनी लॉकडाऊन म्हणजे गोरगरीब जनतेची पिळवणूक आहे असे ते म्हणाले.हेदेखील वाचा- Jitendra Awhad Praises CM: उद्धव ठाकरे होणं अवघड आहे- जितेंद्र आव्हाड

"आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या या लबाड सरकारने पुन्हा लॉकडाउन करताना जनता जुमानत नसल्याचं कारण देऊन यावेळी जनतेवरच आपल्या अपयशाचं खापर फोडलं आहे," असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केला आहे.

"ठाकरे सरकारने करोना नियंत्रणासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आणि करोनाचे निर्बंध जसं की सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे इत्यादी नियम आणखी कडक करायला हवे होते. कारण हा लॉकडाउन गोरगरीब जनतेला परवडण्यासारखा नाही" असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर सडकून टिका केली आहे