Chandrakant Patil Mother Passed Away: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक, सरस्वती पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील (Saraswati Bacchu Patil) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सरस्वती पाटील 91 वर्षांच्या असुन कोल्हापूरातील (Kolhapur) राहत्या घरी त्यांचं वृध्दपकाळाने निधन झालं. आज सायंकाळी साडेआठ वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे सरस्वती पाटील म्हणजेचं चंद्रकांतदादा पाटील यांच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील आज काही कामा निमित्त दुपारी कोल्हापुरात आले होते.  भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांची सायंकाळी सहा वाजता बैठक होती.

बैठकीपूर्वी आशिर्वाद घेण्यासाठी चंद्रकांत दादा अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मात्र बैठकीला जाण्यापूर्वी आपण आईंना भेटून येतो असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी  निवासस्थानी गाठत आईची भेट घेतली. आईंना भेटल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी निघाले. पण चंद्रकांत पाटील बैठकीसाठी बाहेर पडताच त्यांच्या मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. संबंधीत घटनेबाबत खुद्द भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ट्वीट करत माहिती दिली आहे.

Tweet

आ. चंद्कांत पाटील यांनी ट्वीट केलं आहे की, माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच.. ओम शांती! सरस्वती पाटील यांच्या पश्चात एक मुलगा म्हणजे चंद्रकांत पाटील, सून, दोन मुली असा परिवार आहे.