मुंबई: मध्य रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे लोकल 20 मिनिटं उशिरा
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणार्‍या मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सुमारे 20 मिनिटं रेल्वे उशिराने धावत आहे.मुंब्रा-दिवा रेल्वे ट्रॅकवर लोकल रांगा एकापाठी एक उभ्या असल्याचं चित्र आहे.

सकाळच्या वेळेत मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने अनेक चाकरमानी आणि सामान्य मुंबईकरांनाही त्रास होत आहे. रेल्वे उशिराने धावत असल्याने रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेतही खचाखच गर्दीमध्ये प्रवास करावा लागत आहे. मुंबईतील वातानुकूलित लोकल रेल्वेचा प्रवास महागला, 1 जूनपासून होणार नवीन दरवाढ होणार लागू

सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळित होण्याची ही या आठवड्याभरातील दुसरी घटना आहे.