वैभववाडी - कोल्हापूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजूरी
Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

कोल्हापूर कोकणाला जोडणारा बहुप्रतिक्षित वैभववाडी - कोल्हापूर (Vaibhavwadi and Kolhapur) या रेल्वे मार्गाला आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. मागील दोन वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता पुन्हा जोर धरणार आहे. मार्च महिन्यात या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली होती. आता पुढील पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा प्रकल्प 108 किमी लांबीचा आहे. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu)  यांनी या प्रकल्पाला गती दिली होती.

मध्य रेल्वेची माहिती 

वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग कोणत्या मार्गावरून धावणार?

केंद्र सरकारने वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना फायदा होणार आहे. हा मार्ग कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, बीड, सोलापूर तर कर्नाटकातील बेळगाव, बेल्लारी आणि गुलबर्गा मधून जाणार आहे. या मार्गासाठी सुमारे 3 हजार 439 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तसेच 26 लाख नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

वैभववाडी - कोल्हापूर मार्गामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.