गोंदिया : पंजे कापलेल्या अवस्थेत सापडल बिबट्याचं मृत शरीर, तस्करीतून हत्या झाल्याचा अंदाज
Carcass of a leopard with its paws cut off ( Photo credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्रामध्ये अवनी या वाघिणीला वन विभागाने ठार केल्याने राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत असताना आता गोंदियामध्येही एका बिबट्याला ( leopard ) गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याची नखं मिळवण्याच्या हेतूने पंजे कापल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. बिबट्याच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये (Postmortem Report )दोन गोळ्या झाडल्याचं समजलं आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव जंगल परिसरामध्ये बिबट्यावर हल्ला करून पंजा कापल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे. बिबट्याची शिकार केल्यानंतर शिकारी सध्या मोकाट असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी युट्युबवर औरंगाबादच्या घाटात बिबट्या खुलेआम फिरत असल्याचा एक व्हिडीओ युट्युबवर व्हायरल झाला होता.