C40 Urban Nature Declaration: भविष्यामध्ये लक्षणीय हिरवळ असणाऱ्या जगातील 31 शहरांच्या यादीमध्ये Mumbai चा समावेश
Aarey Colony (Photo credits: Video grab)

मुंबई (Mumbai) हे जगातील अशा 31 शहरांच्या यादीमध्ये सामील झाले आहे, जिथे येत्या काही वर्षांत बरीच हिरवळ (Significantly Greener) होईल. जगभरातील 31 शहरांनी सी 40 अर्बन नेचर डिक्लेरेशनवर (C40 Urban Nature Declaration) वर स्वाक्षरी केली आहे. या शहरांच्या महापौरांनी त्यांच्या शहरांमध्ये शहरी उद्याने, झाडे, गार्डन्स, तलाव यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. शहरामधील हिरवळ वाढल्याने, जीवन आरोग्यदायी होण्यास, हवेची गुणवत्ता सुधारण्यास आणि शहरांना अति उष्णता, पूर व दुष्काळ यांसारख्या हवामान संकटांच्या तीव्र परिणामांपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

सी 40 अर्बन नेचर डिक्लेरेशनवर स्वाक्षरी करणार्‍या शहरांद्वारे निश्चित केलेली उद्दिष्टे- सार्वजनिक हिरव्या आणि निळ्या स्थानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पहायला मिळेल. शहरातील नद्या सुधारण्यासाठी डर्बन येथे परिवर्तनशील नदी व्यवस्थापन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. ज्यामुळे सुधारणेसोबतच हजारो ग्रीन रोजगारनिर्मिती होईल. बार्सिलोना नवीन हिरव्या छप्परांच्या किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देईल. पावसाचे पाणी कान्कालीत केले जाईल आणि द्रिय कचर्‍यासाठी कंपोस्टिंग करेल.

ग्वाडलजारामध्ये 70 हजार ग्रीन कॉरिडोरमध्ये 67,000 नवीन झाडे लावली जातील आणि 50 हून अधिक नवीन सार्वजनिक उद्याने बांधली जातील. टोरोंटोच्या शहरी वन अनुदान आणि प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत 13,000 पेक्षा जास्त झाडे आणि झुडपे लावली जातील. मुंबईत, राज्य सरकार वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे व वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्ष कायद्यात दुरुस्ती करीत असून, अधिक खारफुटीच्या झाडांचे संरक्षण करत आहे.

सी 40 अर्बन नेचर डिक्लेरेशनवर स्वाक्षरी करणारी शहरे, उष्णता आणि पाण्याशी संबंधित समस्यांवर लक्ष देत आहेत. 2030 पर्यंत शहराच्या एकूण अंगभूत पृष्ठभागापैकी 30-40 टक्क्यांमध्ये रस्त्यावरील झाडे, शहरी जंगले आणि उद्याने उभे राहतील हे सुनिश्चित केले जाईल. तसेच हेदेखील सुनिश्चित केले जाईल की, 2030 पर्यंत शहरातील 70 टक्के लोकसंख्या अगदी 15 मिनिटांमध्ये पायी किंवा दुचाकीवरून ग्रीन व ब्ल्यू जागांवर पोहोचू शकेल. (हेही वाचा: राज्यातील खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या नियम, अटी व कुठे सबमिट कराल व्हिडिओ रेसीपी)

दरम्यान, 2050 पर्यंत 570 पेक्षा जास्त शहरांमध्ये समुद्र पातळी वाढेल. 500 पेक्षा जास्त शहरांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेची समस्या निर्माण होईल आणि 970 पेक्षा जास्त शहरांना अति उष्णतेची समस्या निर्माण होईल.