बुलढाणा: पुणे येथून खामगाव तालुक्यात आल्येल्या तरुणासह कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची लागण
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांसह बळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान, पुणे येथून बुलढाणा येथील खामगाव तालुक्यात आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. या तरुणासह कुटुंबातील 7 जणांची सुद्धा कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

बुलढाणा येथे आता कोरोनाबाधितांचा आकडा 8 वर पोहचला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खरबदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून संपुर्ण गाव सील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाचा वेग संथ करण्यात यश जरी आले असले तरीही त्याची साखळी तुटली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि राज्य ही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे.(Lockdown: लॉकडाऊन काळात कोणत्या टप्प्यात कोरोना व्हायरस संक्रमित किती नागरिकांचा मत्यू झाला? महाराष्ट्र, भारत संपूर्ण आकडेवारी)

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी 3041 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 58 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 50231 वर पोहचला आहे. त्यापैकी 33988 जण अॅक्टिव्ह असून एकूण 1635 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 14600 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.