Sadanand Lad Suicide: सदानंद लाड यांच्या आत्महता प्रकरणाचे गुढ उकलले, सुसाईड नोटमध्ये आढळली दोन बड्या व्यक्तींनी नावे
सदानंद लाड ( फोटो सौजन्य- फेसबुक)

Sadanand Lad Suicide: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे निकटवर्तीय आणि चित्रपट निर्माते सदानंद लाड (Sadanand Lad) यांनी मंगळवारी (16 जानेवारी) 'लाडाचा गणपती'  मंदिरात आत्महत्या केली. त्यावेळी सदानंद यांच्या आत्महत्येचे कारण उघडकीस आले नव्हते. परंतु आता सदानंद लाड यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली असून त्यात दोन बड्या व्यक्तींची नावे पुढे आली आहेत.

सदानंद लाड यांनी गणपती मंदिराच्या टेरेसच्या छताच्या अँगलला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी लाड यांनी एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. तर सुसाईड नोटमध्ये बिल्डर सिद्धार्थ ग्रुप आणि ताहीर भाई यांच्या बळजबरीच्या कारभाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी लाड यांचा मुलगा अंकुर याने बिल्डर सिद्धार्थ ग्रुप आणि ताहीर भाई यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तर सुसाईड नोट मध्ये लिहिलेल्या व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लाड हे चित्रपट निर्माते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी 15 हून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.