Uddhav Thackeray | PC: Twitter

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (BS Koshyari) यांच्या मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी लोकांच्या योगदानाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर विरोधकांकडून कडाडून टीका होत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील बरसले आहे. आक्रमक अंदाजात बोलताना त्यांनी राज्यपालांकडून मराठी जनतेचा अपमान तर झाला आहेच पण त्यासोबतच त्यांनी हिंदूंमध्येदेखील फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मराठी लोकांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. कोश्यारींनी राज्यपाल पदाची शान राखलेली नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे. दरम्यान महाराष्ट्रात राहून त्यांनी राज्यातील अनेक भूषावह गोष्टी पाहिल्या असतील तर आता त्यांनी कोल्हापुरी वहाण दाखवण्याची देखील वेळ आल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहता मराठी-गैर मराठी यांच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपालांची भाषणं नेमकी कोण लिहून देतं? दिल्लीवरून त्यांची भाषणं लिहली जातात का? हे पहायला पाहिजे असं ते म्हणाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा दिसून येत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  महाराष्ट्राच्या खाल्ल्या मीठाला जागा याची त्यांना पुन्हा आठवण करून देण्यात आली आहे. नक्की वाचा: BS Koshyari Controversial Statement: 'मुंबई' बाबतच्या आक्षेपार्ह विधानावर Supriya Sule ते Sandeep Deshpande, Sanjay Raut यांनी दिली ही प्रतिक्रिया.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना परत पाठवण्यासाठी सरकारने काही भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. काही वेळापूर्वीच भगतसिंग कोश्यारी यांनी ट्वीटर वर आपली भूमिका स्पष्ट करताना एका समाजाचं कौतुक म्हणजे दुसर्‍या समाजाचा अनादर असं होत नाही. माझ्याकडून महाराष्ट्राचा कधीच अवमान होणार नाही असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचं स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान राज्यपाल यांच्या मराठी द्वेष्ट्या विधानावर विरोधकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांचा निषेध देखील व्यक्त केला आहे.