Atrocity Case: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त Param Bir Singh यांना अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये 9 जून पर्यंत अटकेपासून  दिलासा
Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांना अ‍ॅट्रोसिटीच्या (Atrocity Case प्रकरणामध्ये 9 जून पर्यंत दिलास मिळाला आहे. आज तशी ग्वाही राज्य सरकार कडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये  (Bombay HC) देण्यात आली आहे. मात्र तो पर्यंत परमबीर सिंह यांनी देखील तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आता कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने त्या संपल्यानंतर 15 दिवसांच्या ब्रेकने या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू केली जाईल असं देखील सांगण्यात आले आहे. Param Bir Singh: परमबीर सिंह पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात; तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप.

पोलिस इन्स्पेक्टर भीमराव घाडगे (Police Inspector Bhimrao Ghadge) यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, परमबीर सिंह यांनी आपल्याला मानहानीकारक वागणूक दिली, त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले, आणि जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केला. दरम्यान सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावत एफआयआर रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. ही तक्रार 20215 ची असून आता त्यावर गुन्हा दाखल होत असल्याने अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

ANI Tweet

दरम्यान परमबीर सिंह यांची बाजू कोर्टात वकील महेश जेठमलानी यांच्याकडून मांडली जात आहे. परमबीर सिंह यांच्यावरील सारे आरोप आणि दाखल इतर गुन्हे निव्वळ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात त्यांनी लिहिलेल्या पत्राचा सूड उगवण्यासाठीच केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी बॉम्बे हायकोर्टात केला आहे. पण राज्य सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. राज्य सरकारच्यावतीनं विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा काम करत आहेत.