Bomb Threat to Haji Ali Dargah: हाजी अली दर्ग्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

ही धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध तारदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे यासह विविध कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Haji Ali Dargah (Photo Credit - Wikimedia Commons)

Bomb Threat to Haji Ali Dargah: मुंबईतून अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईतील हाजी अली दर्ग्याला (Haji Ali Dargah) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. ही धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध तारदेव पोलिसांनी (Tardeo Police) गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे आणि धार्मिक भावना दुखावणे यासह विविध कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने स्वत:ची पवन अशी ओळख सांगून हाजी अली कार्यालयात फोन केला. हा कॉल दिल्लीतून आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हाजी अली दर्गाचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख (42) यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 351(2), 352, 353(2) आणि 353(3) अंतर्गत अज्ञात आरोपिविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मंगळवार आणि बुधवारी दोन वेगवेगळे मोबाईल वापरून दोन धमकीचे फोन केले. (हेही वाचा -Vashi Bomb Threat: वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस आणि बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल)

प्राप्त माहितीनुसार, पहिला कॉल 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या मोबाईलवर आला होता. हा कॉल संकेतस्थळावरून प्राप्त झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख 'दिल्लीचा पवन' अशी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. (हेही वाचा -CSMT Bomb Threat: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; फोन करणाऱ्या व्यक्तीला जीआरपीने घेतले ताब्यात, चौकशी सुरु)

तथापी, आरोपीने दर्गा रिकामा न केल्यास तो उडवून देण्याची धमकी दिली. तसेच जो कोणी जवळ येईल त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा इशाराही आरोपीने दिला. या फोननंतर लगेचच दुसरा धमकीचा कॉल आला. खबरदारीचा उपाय म्हणून हाजी अली परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र, याठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.