Bomb Threat At Poona Hospital: बॉम्बच्या धमकीच्या फोनने पूना हॉस्पिटलमध्ये खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू
Poona Hospital (PC - Wikimedia commons)

Bomb Threat At Poona Hospital: गुरुवारी रात्री बॉम्बच्या धमकीच्या (Bomb Threat) फोनने नवी पेठेतील पूना हॉस्पिटलमध्ये (Poona Hospital) खळबळ उडाली. धमकीच्या फोननंतर पुणे शहर पोलिसांनी रुग्णालय परिसराची कसून तपासणी केली. सुदैवाने, तपासणीदरम्यान कोणतीही स्फोटक साधने सापडली नाहीत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास, पोलिस अधिकाऱ्यांना कंट्रोल रूमवर कॉल आला. कॉलरने पोलिसांना पूना हॉस्पिटलमध्ये कथित बॉम्ब ठेवल्याबद्दल सूचित केले. या घटनेची माहिती तातडीने विश्रामबाग पोलीस ठाणे आणि बॉम्बशोधक पथकाला देण्यात आली.

धोक्याची विश्वासार्हता अद्याप पडताळून पाहिली गेली नसली तरी बॉम्बच्या संभाव्य धोक्याबाबत अफवा पसरू लागल्याने आजूबाजूच्या परिसरात चिंता वाढली. बॉम्बशोधक पथकाने मध्यरात्रीपर्यंत संशयास्पद वस्तू तपासत सर्वंकष चौकशी केली. मात्र, बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. पोलिस नियंत्रण कक्षाला केलेला फोन हा घातपाताचा प्रकार असल्याचे उघड झाले. सध्या पोलिस धमकीचा फोन करणाऱ्या कॉलरचा शोध घेत आहेत. (हेही वाचा -Bomb threat to RBI office in Mumbai: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालय सह 11 ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्याच्या धमकीचा इमेल)

दरम्यान, आज मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपूर्ण शहरात बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा मेसेज अज्ञात व्यक्तीकडून आला होता. शहरात सहा ठिकाणी स्फोटके ठेवण्यात आल्याचं कॉलरने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती.

तथापी, पोलिस हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. 24 जानेवारी रोजी, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. येथे दरभंगा ते दिल्ली फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर 'संपूर्ण आणीबाणी' घोषित करण्यात आली होती. परंतु, नंतर तो फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. (वाचा - Bomb Threat: दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसह 7 विमानतळांवर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; जयपूर विमानतळावर खळबळ)

याशिवाय, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील किमान आठ संस्थांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले होते. या मेलमध्ये भायखळा प्राणीसंग्रहालयावर हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली होती.