BMC ward committee elections: बीएमसी प्रभाग समिती निवडणुकीस अधिकारी अनुपस्थित, मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर यांचा दालतनात ठिय्या
Mayor Kishori Pednekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

मुंबई महापालिका प्रभाग समिती ( BMC Ward Committee) निवडणुकीस स्वत: कर्मचारीच गैरहजर राहिल्याचे आज पाहायला मिळाले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांनी स्वत:च्याच दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका ( BMC Ward Committee Elections)आज आयोजित करण्यात आल्या होत्या. या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी हजर राहणे आपेक्षीत असते. परंतू, हे अधिकारी गैरहजर राहिले. केवळ चिटणीस विभआगातील दोनच कर्मचारी उपस्थित होते. इतर सर्व कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे महापौर पेडणेकर (Kishori Pednekar ) आक्रमक झाल्या आणि त्यांनी स्वत:च्याच दालनात ठिय्या मांडला.

मुंबई महापालिका प्रभाग समिती निवडणुका नियोजित वेळेनुसार बुधवारी (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. या निवडणुकांसाठी सकाळी 10 वाजताची वेळ निश्चीत करण्यात आली होती. त्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर नगरसेवक सकाळी 9.30 पासूनच उपस्थित होते. मात्र, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहिले असतानाही सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकाहीही गैरहजर होते. केवळ चिटणीस विभागातील दोनच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे महापौर संतप्त झाल्या आणि त्यांनी आपल्या दालनात ठिय्या मांडला.

दरम्यान, प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस अधिकारी गैरहजर असल्याने महापौर संतापल्या. या वेळी आयुक्त इकबाल चहल आणि महापौर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचेही वृत्त आहे. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: इकबाल चहल यांनी महापौरांसी ज्या पद्धतीने बोलायला हवे होते तसे ते बोलले नाहीत. त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी राज्य सरकारच्या सेवेत परत जावे, असेही पेडणेकर यांनी या वेळी म्हटले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना एक पत्रही देणार असल्याचे म्हटले. (हेही वाचा, Mumbai Power Outage: मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत)

दरम्यान, मुंबई महापालिकेत एकूण 17 समित्या आहेत. एकूण 17 समित्यांपैकी प्रत्यक्षात 8 प्रभाग समित्यांसाठीच निवडणुका होत आहेत. त्यातही 6 प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध होत आहे. केवळ एका प्रभाग समितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झालाआहे. त्यामुळे त्या समितीसाठी निवडणूक होणार आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. त्या ठिकाणी 3 समित्यांवर शिवसेना तर उर्वरीत 3 समित्यांवर भाजप उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडूण येऊ शकतील.