Mumbai: बीएमसी आणि MMRDA ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्याची आखतेय योजना
Mumbai | (Photo Credits-ANI)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) सध्याच्या ईस्टर्न फ्रीवेचा (Eastern Freeway) विस्तार दक्षिण मुंबईपर्यंत करण्याचा आणि वाहतुकीचा त्रास कमी करण्यासाठी शहराच्या पश्चिम किनारपट्टीला जोडण्याचा विचार करत आहेत. मंगळवारी, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएचे प्रमुख एसव्हीआर श्रीनिवास आणि महापालिका आयुक्त आयएस चहल यांच्यासोबत फ्रीवेच्या विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी बैठक घेतली. सध्या, ईस्टर्न फ्रीवे मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडपासून सुरू होतो आणि दक्षिण मुंबईतील कर्नाक बंदरजवळ पीडी मेलो रोडवर संपतो. या रस्त्यामुळे दक्षिण मुंबईचा शहराच्या पूर्वेकडील भागाशी संपर्काचा प्रश्न सुटला आहे. हेही वाचा Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बैठकीनंतर, ठाकरे यांनी ट्विट केले, इस्टर्न फ्रीवे दक्षिणेकडे विस्तारित करण्यासाठी आणि वाहतूक अडथळे दूर करण्यासाठी मुंबईच्या पश्चिम किनार्‍याशी जोडण्यावर काम करण्यासाठी @mybmc आणि @MMRDAOfficial MC सह बैठक घेतली.एमएमआरडीएने कफ परेड ते नरिमन पॉइंट दरम्यान पूल बांधण्याचेही नियोजन केले आहे. अधिका-यांनी सांगितले की, जर सर्व काही योजनेनुसार झाले तर मरीन ड्राइव्ह येथे ईस्टर्न फ्रीवे पश्चिम किनारपट्टीशी जोडला जाऊ शकतो.