BKC-Chunabhatti फ्लायओव्हर आजपासून मुंबईकरांच्या सेवेत; सायन जवळील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार
BKC-Chunabhatti Flyover | Photo Credits: Twitter

मुंबई आणि ट्राफिक हे अगदी समीकरणंच आहे. मुंबई उपनगरातून मुंबई शहर आणि नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी सायन मार्गे जावं लागत असल्याने सायन भागात मोठी वाहतूक कोंडी मुंबईकर मागील अनेक वर्ष अनुभवत आहेत. मात्र आता ही वाहतूक कोंडी फूटण्याची शक्यता आहे. आजपासून बीकेसी- चुनाभट्टी हा फ्लायओव्हर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

बीकेसी - चुनाभट्टी या फ्लायओव्हरमुळे मुंबईकरांचा किमान 30 मिनिटांचा प्रवासातील वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. यामुले सायन, धारावी जंक्शनमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट

बीकेसी-चुनाभट्टी या पूलाचे भूमिपूजन एप्रिल 2015 साली झाले होते. सुरुवातीच्या काळात या प्रोजेक्टची किंमत 261 कोटी होती जी आता 203 कोटी पर्यंत आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार नबाब मलिक यांनी मागील महिन्यात आक्रमक भुमिका घेतली होती. सरकारला या पुलाचे उद्घाटन करुन जनतेसाठी खुला करायचा नसेल तर, तो आम्ही खुला करु असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच नवाब मलिक यांनी चुनाभट्टी- बीकेसी पुलाकडे गेल्यानंतर जेसीबीवर उभा राहून त्यांनी आंदोलनदेखील केले होते.