Chandrakant Patil on Delhi Visit: 'सूत्रं शोधून द्या, जेवायला देतो' दिल्ली वारीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
Chandrakant Patil | (Photo Credit - Twitter)

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन नुकतीच केंद्रीय मंत्री आणि माजी भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या. यावर प्रसारमाध्यमांनी थेट चंद्रकांत पाटील यांनाच विचराले. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रसारमाध्यमांनी सर्व बातम्या सूत्राच्या आधारे दिल्या. हिंमत असेल तर सूत्रांची नावे जाहीर करा. सूत्रे जाहीर केली तर तुम्हाला जेवण देईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

'प्रसारमाध्यमे आमच्याबाबत सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देतात. पण हिंमत असेल तर त्यांना सूत्रांचे नाव जाहीर करायला सांगा. त्यांना माहित नाही चंद्रकांत पाटील ही काय चीज आहे. माहिती देणारी सूत्रे असणारी लोकं आमच्या पक्षातील आहेत की बाहेरच्या याबाबत मला माहिती नाही.',असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. (हेही वाचा, Nanded: चंद्रकांत पाटील यांचे गावजेवण मतदारांनी नाकारले)

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, तुम्हाला द्यायच्या त्या बातम्या द्या. तुम्ही काय बातम्या देता, तुमचे मत काय यावरुन मी माझे काम करत नाही. माझ्यासाठी माझ्या पक्षनेत्यांचे मत महत्त्वाचे असते. आणि त्या मतामध्ये त्यांनी काही म्हटलं तर मग काय करायचं? त्याला मी समर्थ आहे. ४२ वर्षे आहेत, काही कमी वर्षे आहेत का? असा सवाल करत तुम्हाला माहिती देणाऱ्या सूत्रांची नावे जाहीर करा ना!, असे पाटील म्हणाले.