Bihar Political Crisis: भाजपला धक्का? बिहारमध्ये नीतीश कुमार सरकार कोसळण्याच्या वाटेवर; RJD, JDU जुळवणार नवी समिकरणे, मुख्यमंत्र्यांनी मागितली राज्यपालांची वेळ, घ्या जाणून
Nitish Kumar | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राजकीय (Bihar Political Crisis) उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत. बिहारमध्ये भाजपला (BJP) जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांचा राष्ट्रीय जनता दल (युनायटेड) (RJD) आणि लालू प्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांचा राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा नव्याने सत्तासमिकरण राबिण्याच्या विचारात असल्याचे दिसते. दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन विचारविनिमय केला. त्यानंतर नीतीश कुमार हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला नीतीश कुमार यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळही मागितली आहे.

बिहारच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की, नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील भाजपचे 16 मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी ही शक्यता वर्तवली आहे. दुसऱ्या बाजूला उल्लेखनीय वृत्त असे की, नीतीश कुमार यांनी बोलावलेल्या पक्ष आमदारांच्या बैठकीपूर्वी काँग्रेस, सीपीआयएमएल आणि जीतन राम माँझी यांनी नितीश कुमार यांना बिनशर्थ पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दादा भुसे, अब्दुल सत्तार ते राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांचाही समावेश)

दरम्यान, चर्चा आहे की, नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीत नितीश कुमार हे राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवतील. या वेळी नीतीश कुमार यांच्यासोबतच तेजस्वी यादव हेदेखील राज्यपालांशी चर्चा करतील. नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव दोघे सोबतच राज्यपालांकडे जातील असेही सांगितले जात आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुरध्वनीवरुन चर्चा केली. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहारमधील राजकीय स्थिती आणि एकूणच घटनाक्रमावर आक्रमक स्वरुपात प्रतिक्रिया देण्याबात सूचना देण्यात आल्याचे समजते.

ट्विट

सत्ताबदल

शक्यता वर्तवली जात आहे की, भाजपशी संबंध तोडल्यानंतर नीतीश कुमार आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत मिळून नवे सरकार स्थापन करतील. उल्लेकनीय असे की, आरजेडी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना पटनामध्येच राहण्याचे आदेश दिले आहेत.