BEST 7  एप्रिल पासून मुंबईकरांच्या सेवत आणणार Multi-Purpose Mobile Vans; वीज, पाणी बिल ते प्रॉपर्टी टॅक्स भरा सहज
BEST Light (Photo Credits-Facebook)

मुंबई (Mumbai) मध्ये पहिल्यांदाच बेस्ट (BEST) कडून शहरात खास मोबाईल व्हॅन फिरवली जाणार आहे. या व्हॅनच्या माध्यमातून आता मुंबईकर प्रिपेड, पोस्ट पेड बिल्स, गॅस बिल, शाळेची फी, वीजेचं बील, टेलिफोन लॅन्डलाईन, केबल, इंटरनेट ब्रॉडब्रॅन्ड, इन्श्युरंस प्रिमियम, पाण्याचं बिल, फास्टटॅग, प्रॉपर्टी टॅक्स भरू शकणार आहेत. ही सेवा 7 एप्रिल पासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा दक्षिण मुंबईत सुरू होणार असून पेमेंट साठी क्रेडीट कार्ड्स,डेबिट कार्ड्स, युपीआय आणि रुपे सेवा देखील वापरता येणार आहे.

FPJ च्या माहितीनुसार, बेस्टच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल व्हॅन ही फिरतीवरही असेल आणि ठराविक कालावधीसाठी शहरातील ठराविक ठिकाणी पार्क देखील केली जाईल.

बेस्टचे अधिकारी या मोबाईल व्हॅनचे वेळापत्रक ठरवत आहेत, जे किमान सकाळी 8 ते सायंकाळी 7 ते 8 या वेळेत सुमारे 12 तास कार्यरत राहील. लवकरच त्याचं वेळापत्रक जारी केलं जाईल. नक्की वाचा: Double-Decker Buses in Mumbai: बेस्टच्या ताफ्यात येणार 900 इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस; मंत्री Aditya Thackeray यांनी केली 'ही' विनंती.

काही दिवसांपूर्वीच बेस्ट ने चलो अ‍ॅप लॉन्च केले आहे. या अ‍ॅप द्वारा बसचं लाईव्ह लोकेशन, रिअल टाईममध्ये गर्दीची स्थिती ते तिकीट बुकिंगची सोय दिली आहे. दरम्यान यावर आता वीज ग्राहकांनादेखील बील भरण्याची मुभा दिली जाणार आहे.