अयोध्या राम मंदिरासाठी फक्त एक कोटी दिल्याने नितेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray (PC- Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आले होते. तर शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, अनेक नेते आणि पदाधिकारीही अयोध्येला रवाना झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागातासाठी फैजाबाद आणि अयोध्येत सर्वत्र बॅनर लावण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत गेल्यावर प्रथम रामल्लांचे दर्शन घेतल्यानंतर घेतले. त्यानंतर ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार अयोध्या राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपये देणार असल्याचे जाहिर केले. मात्र राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.

नितेश राणे यांनी टीका करत असे म्हटले आहे की, मुलाच्या हट्टासाठी 45 कोटी रुपये दिले. पण राम मंदिरासाठी फक्त एक कोटी रुपये दिले असल्याचे त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच मुलाला त्यांनी पेग्विंन असे सुद्धा नितेश राणे यांनी म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केल्याचे दिसून आले होते. तर आताच्या टिकेवर अद्याप शिवसेनेकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.(ठाकरे सरकारने 100 दिवसांत काय केलं? पहा सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 111 सेकंदात 'हा' व्हिडिओ)

कोरोना व्हायरसमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरयूच्या तीरावरील कार्यक्रम रद्द केला. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार शिवसेनेच्या किमान एका तरी सदस्याला राम मंदिराच्या समितीमध्ये घ्यावे असे त्यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. राम मंदिराच्या चळवळीमध्ये शिवसेनेचे मोलाचे कार्य असल्याचे ही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.