Aurangabad: मराठवाड्याचा लेक देशात पहिला, रुरल जुगाड स्पर्धेत ठरला विजयाचा मानकरी

टेक्नोलॉजी (Technology) खूप डेव्हलप (Develop) झाली असली, तासांचं काम अगदी मिनिटांत (Minutes) होत असलं तरी देशातील ग्रामीण (Rural) भागात अजून सगळ्या सेवा पोहचल्या नाहीत किंवा उपलब्ध असल्या तरी त्या गावकऱ्यांना परवडण्यासाख्या नाही. म्हणून मोठा त्रास सहन करुन ग्रामिण भागातील लोकांना आपली काम पार पाडावी लागतात. पण ग्रामीण भागातील याच समस्यांची दखल घेत सीआयआय यंग इंडिअन्स (CII Young Indians) संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर (National Level) ‘रुरल जुगाड स्पर्धा’ घेण्यात आली होती. ज्यात खेडेभागातील लोकांना रोजच्या वापरात येणाऱ्या तसेच समस्या सोडवणाऱ्या वस्तू टेक्नोलॉजीच्या (Technology) माध्यमातून साकारण्याची ही स्पर्धा होती. तसेच या स्पर्धेत साकरण्यात येणारी वस्तू बनवण्यासाठी कमीत कमी पैसे लागावे हे या स्पर्धेच वैशिष्ट होत. देशभरातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते तरी औरंगाबादच्या (Aurangabad) पठ्ठ्यानं या अनोख्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

 

 

या स्पर्धेतील विजेत्याचं नाव अक्षय चव्हाण (Akshay Chavan) असून औरंगाबाद (Aurangabad) येथील ‘जिजाई ट्रेलर आणि इक्विपमेंट कंपनी’ (Jijai Trailer And Equipment) येथे काम करतो. अक्षय यांनी ‘सेल्फ ड्राइव्ह हेवी ड्युटी ट्रेलर’ने (Self Drive Heavy Duty Trailer) ट्रॅक्टर आणि ट्रॉली (Tractor And Trolley) याची क्षमता वाढणारे उत्पादन विकसित केले असून, या उत्पादनाचा मोठा फायदा शेतमाल वाहतुकीदरम्यान होणार आहे. सध्या वापरात असलेल्या वाहनांमध्ये जास्त भारामुळे इंधनाचा (Fuel) वापर जास्त होतो तसेच वाहतूक प्रक्रियेला वेळ लागतो. पण अक्षयने विकसित केलेल्या ट्रेलर मधून शेतकऱ्याची मोठी समस्या मिटणार आहे. (हे ही वाचा:- Pratapgad Mashal Mahotsav 2022: प्रतापगड 362 मशालांनी झळाळला; पहा नयनरम्य नजारा (Watch Video)

 

सीआयआयने यंग इंडिअन्स (CII Young Indians) संस्थेच्या देशपातळीवरील 52  केंद्रांच्या माध्यमातून स्पर्धेकरिता सहभाग आमंत्रित केलं होतं. देशातील विविध राज्यातून स्पर्धक या विशेष स्पर्धेत सहभागी झाले होते. तरी या स्पर्धेच्या अंतीम फेरीत (Last Round) औरंगाबादच्याच (Aurangabad) दोन्ही स्टार्टअप्सनी स्पर्धेची अंतिम फेरी (Final Round) गाठली आणि अखेर अक्षय चव्हाण या स्पर्धेचा विजेता ठरला. देशाच्या विविध स्तरातून अक्षयचं कौतुक होत आहे तसेच पुढील कालावधील अशाच काही अनोख्या वस्तू विकसित करण्याचा अक्षचा मानस आहे.