Aurangabad Unlock: औरंगाबाद 21 जूनला होणार अनलॉक पण 'या' गोष्टींचे पालन करावे लागणार
Market (Photo Credits-Twitter)

Aurangabad Unlock: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा मंदावला गेला आहे. अशातच राज्यातील विविध ठिकाणी लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशातच आता औरंगाबादकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण येथे येत्या 21 जून पासून लागू करण्यात आलेले लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जाणार आहेत. म्हणजेच औरंगाबाद मध्ये आता अनलॉकिंग होणार आहे. परंतु यावेळी काही नियमांचे सुद्धा पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.(Pune Weekend Lockdown: पुण्यात विकेंडला 'या' सेवा राहणार बंद)

औरंगाबाद येथे 21 जून पासून जिम, सलून, ब्युटी पार्लर्स, सिनेमागृह, नाट्यगृह, विवाह सोहळा यांच्यासाठी परवानगी असणार आहे. परंतु 50 टक्के उपस्थितीसह या गोष्टी सुरु करण्याची परवानगी असणार आहे. त्याचसोबत शासकीय कार्यालयात शंभर टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थितीत राहता येणार आहे. परंतु यावेळी मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सिंग आणि वेळोवेळी हात धुणे या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या संदर्भातील सुचना आधीच स्थानिक प्रशासनाकडून दिल्या आहेत. या व्यक्तिरिक्त लसीकरणकरणासंबंधित सक्ती केली जाणार आहे. कारण नागरिक लसीकरणासाठी पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहेत.

तसेच औरंगाबाद मध्ये शाळा सुरु करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. मात्र त्यावेळी शाळेतील वर्गांचे सॅनिटायझेशन, हात धुण्यासह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन होईल की नाही याचा विचार करुन निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद मध्ये लवकरच शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Covid-19 Infection Rate: कोल्हापूरमध्ये कोरोना संसर्गाचा दर सर्वात जास्त; सिंधुदुर्गात ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक)

दरम्यान, राज्यात येत्या 21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.महाराष्ट्र हा लसीकरण, ऑक्सीजनच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांची इच्छा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच बोलून दाखवले होते.