औरंगाबाद येथे आणखी 66 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, जिल्ह्यातील COVID19 चा आकडा 13 हजारांच्या पार
Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याच दरम्यान आता औरंगाबाद (Aurangabad) येथे सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत असून आणखी 66 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे औरंगाबाद मधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजारांच्या पार गेला आहे. तसेच आतापर्यंत 8536 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे.(मुंबईतील नॉन-कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक धोका- सर्वेक्षणातून खुलासा)

औरंगाबाद येथे कोरोनासंक्रमितांचा आकडा 13104 वर पोहचला आहे. तसेच 443 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर 4125 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील 40 रुग्णांचा समावेश आहे.(Coronavirus Updates: महाराष्ट्रात COVID19 चा मृत्यूदर 3.63 टक्क्यांवर पोहचला)

राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. त्याचसोबत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑक्सिजन युक्त असलेल्या बेड्सची सुविधेसह क्वारंटाइन सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर्स, नर्स, वैद्यकिय कर्मचारी रुग्णांवर अहोरात्र उपचार करुन त्यांची प्रकृती सुधरावत आहेत. तसेच राज्यात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र उर्वरित ठिकाणी 'मिशन बिगिन अगेन' नुसार काही गोष्टी अनलॉकिंगनुसार सुरु करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.