औरंगाबाद येथे आणखी 25 कोरोनासंक्रमित रुग्णांची भर पडल्याने आकडा 12151 वर पोहचला तर 423 जणांचा बळी
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि पुणे येथे कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. याच दरम्यान आता औरंगाबाद येथे सुद्धा कोरोना व्हायरसच्य रुग्णांची झपाट्याने वाढत होत असल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद येथे आज दुपारी आणखी 25 जणांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद येथे सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 12151 वर पोहचला आहे. त्यापैकी 6690 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तसेच आतापर्यंत 423 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला असून 5038 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. कोरोनाचा वाढता आकडा पाहता त्याच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले होते. तसेच लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिली होती.(ठाणे: कोविड, कॅन्सर औषधांची 5 पट अधिक किंमतीने विक्री करणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक)

दरम्यान, महाराष्ट्रात काल दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्ण आढळून आले. त्यामुळे संक्रमितांची संख्या 3,37,607 वर पोहचला आहे. यात एकूण 12,556 कोरोना मृतांचाही समावेश आहे. राज्यात काल दिवसभरात 280 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, कोरना व्हायरस संक्रमितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी रुग्णसंख्या घटू लागल्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येत आहे.