औरंगाबाद: ध्वजवंदनासाठी शाळेत जाणाऱ्या चिमुरड्याला भरधाव वेगाने आलेल्या गाडीने चिरडले, मृत्यू
Representational Image | (Photo Credits: ANI)

औरंगाबाद (Aurangabad)  येथे ध्वजवंदनासाठी शाळेत जाणाऱ्या चिमुरड्याला भरधाव वेगाने आलेल्या गाडीने चिरडले असल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या प्रकरणी मुलाचा मृत्यू झाला असून घडलेल्या प्रकाराबद्दल त्याच्या पालकांना धक्का बसला आहे.

संभाजी शिंदे असे मुलाचे नाव असून तो सकाळी शाळेत ध्वजवंदनासाठी निघाला होताय. आज स्वातंत्र्य दिन असल्याकारणाने त्याने नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पोशाषसुद्धा घातला होता. मात्र शाळेत जात असताना त्याला सुसाट वेगाने आलेल्या एका गाडीने उडवले. या प्रकारानंतर गाडी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करण्यात आला.(Indian Independence Day 2019: ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले झेंडे आढळल्यास काय कराल?)

सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र सरकारने वाहतुकीसाठी लागू केलेल्या नव्या नियमाअंतर्गत अधिक कडक कारवाई केली पाहिजे. तसेच वेगाने गाडी चालवणे, दारु पिऊन गाडी चालवणे विविध प्रकारच्या चुकांमुळे एखाद्याला आपला जीव गमावा लागतो.