Ashadhi Wari 2025: आषाढी वारी मध्ये यंदा वॉटरप्रुफ मंडप, मॉडेल वारीतळ ते टोलमाफी पहा काय काय मिळणार?
वारीच्या दिवसांमध्ये पावसामुळे वारकर्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी ३६ वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीची (Ashadhi Wari) जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशी च्या निमित्ताने लाखो भाविक मजल-दरमजल करत पंढरपूरामध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. यंदाही संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांसोबतच अनेक संतांच्या पालख्यांसोबत वारकरींचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा वारकर्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वारकर्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना यंदाही टोल मध्ये सवलत दिली जाणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही वारीच्या मार्गावर आरोग्य शिबिरे, कार्डीऍक रुग्णवाहिका, आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. वाखरी येथे एक मॉडेल वारीतळ तयार केला जात असून वारीच्या वेळी व्हीआयपी गाड्या पंढरपूरला जाणार नाहीत यासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे. वारीच्या मुक्कामस्थळावरील 65 एकरात आता रेल्वेच्या जागेची भर पडणार असल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. असा विश्वास सरकार कडून व्यक्त करण्यात आला आहे. Pandharpur Wari 2025 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table: आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान कधी? जाणून घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण वेळापत्रक.
आषाढी वारी च्या निमित्ताने पहा वारकर्यांसाठी कोणत्या गोष्टींचं नियोजन
आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis #आषाढी#वारी#आषाढीवारी#आषाढीएकादशी#आषाढीवारी२०२५ pic.twitter.com/Gmf5lDTVHv
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 28, 2025
वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यामध्ये गरजेनुसार वाढ करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणार आहेत. या वर्षीच्या नियोजनात पर्यावरणीय शाश्वतता हा केंद्रबिंदू राहील. 'निर्मल वारी' आणि 'हरित वारी' या थीम्सच्या अनुषंगाने, राज्य सावलीसाठी स्थानिक वृक्षारोपण, पद्धतशीर कचरा संकलन आणि निवारासाठी ३६ जलरोधक मंडपांची स्थापना यासारख्या हिरव्या पद्धतींना प्रोत्साहन देईल.
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 09:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

