Aryan Khan Drugs Case: एनसीबीचे DDG ज्ञानेश्वर सिंह यांचा समीर वानखेडे यांच्या विरोधात तपास सुरु, झोनल युनिटकडे मागितली 6 प्रकरणातील साक्षीदारांची लिस्ट
Gyaneshwar Singh (Photo Credits-ANI)

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे यांच्यासह एनसीबी अधिकाऱ्यांच्या विरोधातील आरोपांचा तपास करण्यासाठी एनसीबीची विजिलेंस टीमचे चीफ ज्ञानेश्वर सिंह  (Gyaneshwar Singh) मुंबईत आले आहेत. तर एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी एनसीबी मुंबई झोनल युनिटकडे त्या सहा प्रकरणांतील साक्षीदारांची लिस्ट तयार करण्यास सांगितली आहे. एनसीबी अधिकारी आशीष रंजन प्रसाद यांची एसआयटी टीम दोन दिवसांपासून चौकशी करत आहे. चौकशीची रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली आहे.

एनसीबीचे उप महानिर्देशक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली नवगठित तपास दल (SIT) मुंबई झोनल ऑफिसात दाखल आर्यन खानसह सहा ड्रग्ज प्रकरणांचा तपास करत आहे. डीडीजी संजय सिंह गेल्या रात्रीच दिल्लीत परतले आहेत. आर्यन खान प्रकरण, अरमान कोहली प्रकरण आणि समीर खानच्या प्रकरणी एकूण 3 फाइल संदर्भात दिल्ली हेडक्वार्टर गेले. अन्य SIT टीम मुंबईत आहे. अन्य प्रकरणे आणि जबाबाबद्दल अभ्यास केला जात आहे. संजय सिंह हेडक्वार्टरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बातचीत केल्यानंतर मुंबईत येणार आहेत.(Nawab Malik on Sameer Wankhede: तुमच्या मेव्हणीचा ड्रग्ज व्यापारात सहभाग? नवाब मलिक यांनी ट्विट करत दाखवले कोर्टातील प्रलंबित प्रकरणाचे पुरावे)

संजय सिंह हे 1996 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सुद्धा त्या सहा प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सांभाळात आहेत जे आधी पासूनच क्षेत्रीय निर्देशक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली होते. यामध्ये 2 ऑक्टोंबरला झालेल्या क्रुजवरील पार्टीतील छापेमारीचा समावेश आहे. या प्रकरणी बॉलिवूड मेगास्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. एनसीबीने शुक्रवारी या प्रकरणी तपासासाठी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटीचे गठन केले होते. वानखेडे यांच्या विरोधात लाच आणि जबरदस्ती वसूलीच्या कथित आरोपांचा तपास सुरु करण्यात आले. त्यानंतर त्यांना एका आठवड्यानंतर दलातून हटवण्यात आले. मात्र यावर वानखेडे यांनी विरोध करत त्यांनी म्हटले की, मला हटवण्यात आलेले नाही.