औरंगाबाद मधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींसोबतच्या वायरल फोटो वर गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण (Watch Video)
Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा औरंगाबाद (Aurangabad) मध्ये 3 गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या व्यक्तींसोबतचा एक फोटो वायरल झाला आहे. दरम्यान सोशल मीडियात हा फोटो झपाट्याने वायरल होत असल्याने अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता अनिल देशमुख यांनी मीडीया समोर या फोटोबाबत प्रतिक्रिया देत यापुढे दक्षता बाळगेन असं म्हटलं आहे. 'काही दिवसांपूर्वी मी औरंगाबाद दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यात गेल्यावर हजारो लोकं भेटायला येतात, निवेदन देतात. यात कोण कुठून आला, त्याचा काय व्यवसाय आहे, हे माहीत राहत नाही, त्यामुळे हा प्रकार घडला असावा पण यापुढे काळजी घेईन असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर अशा तीन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत अनिल देशमुखांचा फोटो क्लिक झाला आणि नंतर तो वायरल होत आहे. अनिल देशमुखांसोबत असलेल्यापैकी एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. एक जण बलात्कार आणि अन्य गुन्हांत सहभागी आहे. तर एकावर तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे. अशा अतिगंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांसोबत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांचा फोटो पाहून विरोधकांनी त्याच्यावरून टीका करण्यासही सुरूवात केली होती.

अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण

दरम्यान वायरल फोटोमधील दोन जण एमआयएमचे नगरसेवक आहेत. सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कलीम कुरेशी याची औरंगाबाद शहरात गुटखा किंग म्हणून ओळख आहे.