Mumbai News: अनियंत्रित कारची धडक लागल्याने वृध्दाचा मृत्यू, लालबाग येथील घटना
मुंबईतील लालबागजवळ एका वृध्द व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Mumbai News: मुंबईतील लालबागजवळ एका वृध्द व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरत एकच खळबळ उडाली आहे. पहाटे मॉर्निंग वॉक करत असताना, एका भरधाव कारचे नियत्रंण सुटले आणि वृध्द व्यक्तीला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातानंतर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.( हेही वाचा- औसा येथील 'ऑन ड्युटी' पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, पांढुरंग मातारे (वय वर्ष ६०) असे अपघातात मृत झालेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे. पांढुरंग मातारे आणि त्यांचा मित्र विठ्ठल कदम मॉर्निग वॉकसाठी फिरायला गेले होते. २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत मैदानात होणाऱ्या शासकियी कार्यक्रमामुळे त्यांना चालण्यासाठी दुसऱ्या रस्त्यावर गेले होते. अपघाताच्या दिवशी दोघे जण डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने चालत होते.
दरम्यान परळच्या दिशेकडून भायखळाला जाणारी एक भरधाव स्फिट डीझायर कार आली आणि अनियंत्रित होताच पांढुरंगा यांना धडक दिली. या धडकेत दोघे ही जखमी झाले होते परंतु पांढुरंग यांना गंभीर जखम झाली होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. केइएम रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला आणि चालकाला अटक केले.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शहरात अपघाताच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.