पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ अमृता फडणवीस यांची सोशल मीडिया सोडण्याची घोषणा
अमृता फडणवीस (Photo Credits-Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (2 मार्च) ट्वीटरवर एक ट्वीट करत सोशल मीडिया सोडायचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. तर येत्या रविवार पर्यंत नरेंद्र मोदी त्यांचा निर्णय जाहिर करणार आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोदी यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारामागे काय नेमका हेतू आहे याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. तसेच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सुद्धा त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांनी आता फक्त सोशल मीडिया सोडण्याचा विचार केला आहे. तर मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे त्यामुळे असा निर्णय घेण्याचा ते कसा विचार करु शकतात असे म्हटले आहे.याच पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सुद्धा सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. अृता फडणवीस या सुद्धा सोशल मीडियात अॅक्टिव्ह असतात. पण आता नरेंद्र मोदी यांच्या या विचारानंतर त्यांनी सुद्धा आपले मन वळत सोशल मीडियाला रामराम करण्याचे म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, आयुष्यातील काही लहान निर्णय तुमचे कायमच आयुष्य बदलू शकतात. तर आता मी सुद्धा माझ्या नेत्याच्या मार्गावर चालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडिया सोडण्याचा विचार, ट्वीट करत दिली माहिती)

दरम्यान, येत्या रविवारी (8 मार्च) फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि युट्युब सारख्या सोशल मीडियातून माघार घेण्याची शक्यता आहे. ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फॉलोअर्स असून जगातील दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे स्थान आहे. मोदी यांचे ट्वीटरवर 53.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर फेसबुरवर 4 कोटी 47 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स, इन्स्टाग्रामवर 35.2 मिलियन फोलोअर्स आणि युट्युबर 4.5 मिलियन सब्सक्राईबर्स आहेत.