अमरावती: वाई परिसरात आठ दिवसात 16 माकडांचा पाण्याअभावी मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (photo credit : Healthline)

अमरावती (Amravati) येथील वाई (Wai) परिसरात गेल्या आठ दिवसात 16 माकडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर गावातील भीषण पाणी टंचाईमुळे वरुड वनातील माकडांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आपला जीव गमावला आहे.

माकडांचा मृत्यू झाल्याने आता अन्य तेथे वावर असणाऱ्या वन्यप्राणांचा जीव जाऊ नये म्हणून वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्यात पाण्याची सोय करावी अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु पाणवठ्यात भीषण पाणी टंचाईमुळे पाणी मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

(Monsoon Update: 24 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार)

वाई परिसरात येथे तपामानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळेच पाणी टंचाईची कमतरता जाणवत आहे. या प्रकरणी वनविभागाने दुजोरा दिला असून मृत्यू झालेल्या माकडांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.