अमरावती येथे आज आणखी 11 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आकडा 175 वर पोहचला
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि राज्य कोरोनाच्या विखळ्यात अडकले आहेत. तर अमरावती येथे आज 11 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आकडा 175 वर पोहचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाच वेग संथ जरी झाला असला तरीही त्याची साखळी तोडण्यात अद्याप यश आलेले नाही. येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. परंतु राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील असून त्याबाबत तयारी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी विविध ठिकाणी क्वारंटाइन आणि आयसोलेशन सेंटरची उभारणी करण्यात येत आहे.(औरंगाबाद येथे आणखी 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आकडा 1301 वर पोहचली)

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी स्थलांतरित कामगार अडकून पडल्याने त्यांना आपल्या घरी पोहचवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाच्या विरोधातील लढाईत आपण यशस्वी होणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दर्शवला आहे. सद्यच्या स्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे.