Amravati Boat Capsize Incident: वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; 4 मृतदेह हाती

याचं पर्यटकांना आकर्षण आहे. आज सकाळी महादेव मंदिरामध्ये जाताना एक बोट उलटली आणि एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले.

Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

अमरावती (Amravati) मध्ये आज गणेश विसर्जनाच्या दिवशी वर्धा नदीमध्ये (Varada River) बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नावाडी सह चार जणांचे मृतदेह सापडले असून अन्य लोकांचा शोध आहे. दरम्यान गाडेगाव मधील मटरे कुटुंब दशक्रिया विधीला जाण्यासाठी आले असता ही दुर्घटना झाली आहे त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे.

श्री क्षेत्र झुंज येथे नदीपात्रामध्येच एक धबधबा आहे. याचं पर्यटकांना आकर्षण आहे. आज सकाळी महादेव मंदिरामध्ये जाताना एक बोट उलटली आणि एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले. मागील काही दिवस राज्यात पावसाचे देखील जोर वाढला असल्याने अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नदीमध्ये पाणीपातळीत वाढ झाली आहे अशातच क्षमतेपेक्षा जास्त जण प्रवास करत असल्याने बोट पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. IANS Tweets च्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये बोटीत 30 जण प्रवास करत असल्याची माहिती आहे. (अलिबाग: गेट वे ऑफ इंडिया हुन 88 प्रवाशांना घेऊन निघालेली बोट बुडाली; जीवितहानी टळली) .

 IANS Tweets 

At least 11 persons were feared to have drowned in #Maharashtra's Wardha River after an overloaded boat with 30 persons aboard suddenly capsized on Tuesday, police said. pic.twitter.com/l0eL81sMNA

दरम्यान बोटीमध्ये मटारे कुटुंबातील बहिण-भाऊ जावई यांचा समावेश असून सर्वांना जलसमाधी मिळाली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र बचावकार्य सुरू आहे. वर्धातील ही बातमी मिळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.