Amit Shah's Two-Day Maharashtra Visit: अहमदनगर येथे आज सहकार परिषद, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती, शिर्डी साईबाबा दर्शननंतर दौऱ्यास सुरुवात
Amit Shah | ( Photo Credits: Twitter/ ANI)

केंद्रीय गृहमंत्री, देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Amit Shaha In Maharashtra) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रामुख्याने अहमदनगर (Ahmednagar ) येथील प्रवरानगर (Pravaranagar) येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेस उपस्थिती दर्शवणार आहेत. सहकार परिषद (Co-operative Conference) आणि शेतकरी मेळाव्यात अमित शाह काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड , चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. साधारणपणे 20 हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील अशी आशा आहे.

शिर्डी साईबाबा दर्शन घेऊन अमित शाह दौऱ्याची (Amit Shah's Two-Day Maharashtra Visit) सुरुवातकरणार आहेत. शाह यांचा दौरा दोन दिवसांचा असून या काळात ते शिर्डी आणि पुणे दौरा करणार आहेत. शिर्डी साईबाबाचे दर्शन झाल्यावर ते सहकार परिषदेस उपस्थित राहतील. भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने भाजप नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली या सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ अहमदनगर येथूनच सुरु झाली. देशाचे सहकारमंत्री पद स्वीकारल्यानंतर अमित शाह हे पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे सहाजिकच शाह यांच्या दौऱ्याला राजकीय आणि सहकार क्षेत्रातूनही महत्त्व प्राप्त झाले आहे. (हेही वाचा, Amit Shah's Two-Day Maharashtra Visit: अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, अहमदनगर येथील सहकार परिषदेत काय बोलणार याबाबत उत्सुकता)

सहकारमंत्री या नात्याने अमित शाह कोणती मोठी घोषणा करणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण केंद्र सरकारने पाठीमागील काही दिवसांपासून संबंध देशभरातील सहकार क्षेत्राबाबत विशिष्ट धोरणे आखून तशी अंमलबजावणी सुरु केली आहे. प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका यांच्‍या बाबतीत केंद्र सरकारने महत्‍वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्रालयावर सुरुवातीला अनेक शंका घेतल्या गेल्या. तसेच, टीकाही झाली. महाराष्ट्रातूनही या शंका उपस्थित झाल्या, टीकाही झाली. यावर अमित शाह काही उत्तर देतात की भाष्य करतात याबाबतही उत्सुकता आहे.