Fake Ratings On Amazon: फेक रेग्टिंग रोखण्यासाठी अॅमेझॉन कंपनीने हटवले 20 हजार Product Reviews
Amazon | (File Photo)

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (E-Commerce Company Amazon) ने आपल्या संकेतस्थलावरील जवळपास 20,000 प्रोडक्ट रिव्ह्यू (Product Reviews) हटवले आहेत. इंग्लंडमधील काही अभ्यासकांद्वारे फाईव्ह स्टार रेटींग्ज दिल्याबद्दल त्यांना पैसे अथवा प्रॉडक्ट (Amazon Product) दिल्याचा संशय येताच कंपनीने हे पाऊल उचलले आहे. अमेझॉन (Amazon) कंपनीने ही कारवाई तेव्हा केली, जेव्हा फायनान्शिअल टाइम्सने केलेल्या एका चौकशीत अमॅझॉन डॉट को डॉट यूके या संकेतस्थळावर अनेक उत्पादनांच्या प्रत्येकी 10 पैकी 9 युजर्स अथवा अभ्यासकांच्या प्रतिक्रिया संशयास्पद आढळून आल्या.

एका वृत्तानुसार, हे युजर्स/अभ्यासक फाईव्ह स्टार रेटिंग्ज देऊन त्या माध्यमातून पैसे कमावत असत अथवा प्रोडक्ट अथवा सवलती मिळवत असत. यात सर्वात अधिक प्रमाणावर चीनी ब्रांड्सची छोटी मोठी उत्पादने होती. चौकशीत असेही पुढे आले की, अमेझॉन डॉट को डॉट यूके वर रिव्ह्यूअर जस्टिन फ्रायन हे प्रत्येक पाच तासाला कोणत्या ना कोणत्या प्रोडक्टवर आपला रिव्ह्यू देत असत. यात प्रामुख्याने जिममध्ये वापरली जाणारी यंत्रं, स्मार्टफोन आणि इतर उत्पादनांचा समावेश आहे. त्यांनी दुसऱ्याही काही संकतस्थलावरुन या उत्पादनांची विक्री केल्याचे आढळून आले आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, त्यांनी जून 2020 पासून आतापर्यंत जवळपास 1946810.75 रुपये इतकी कमाई केली आहे. (हेही वाचा, World's Most Expensive Sheep: तब्बल साडेतीन कोटींना विकली गेली जगातील सर्वात महागडी मेंढी Double Diamond; स्कॉटलंडच्या लिलावात तीन शेतकऱ्यांनी केली खरेदी (See Pictures & Videos))

एफटीने जेव्हा फ्रायर यांच्यासोबत संपर्क केला तेव्हा, त्यांनी रिव्ह्यू देऊन आपण पैसे कमावल्याच्या आरपाचे खंडण केले. परंतू, एफटीला सांगितले की, त्यांच्या अॅमेझॉन प्रोफाईलमधून रिव्ह्यू करण्यासंदर्भातील सर्व माहिती गहाळ झाली आहे. इंग्लंडमधील आणखी दोन रिव्ह्यूवरनी या आरोपावर असेच उत्तर दिले आहे.