Diadem Miss India 2020: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; एअर हॉस्टेस Rutuja Ravan ने 'डियाडेम मिस इंडिया' मध्ये पटकावलं उपविजेतेपद
Rutuja Ravan (PC - Instagram)

Diadem Miss India 2020: मीरा रोड (Mira Road) येथे राहणाऱ्या मराठमोळ्या तरुणीने महाराष्ट्राच्या शिरपेटात मानाचा तुरा खोवला आहे. एअर हॉस्टेस ऋतुजा रावण (Rutuja Ravan) ने 'डियाडेम मिस इंडिया' (Diadem Miss India 2020) मध्ये उपविजेतेपद पटकावलं आहे. ऋतुजा ही अत्यंत सामान्य घरातील तरुणी असून तिचा उपविजेतेपदापर्यंतचा प्रवास बिकट होता. मात्र, तिने केवळ आपल्या जिद्दीवर आणि मेहनतीच्या बळावर यश मिळवलं.

दरम्यान, दिल्लीतील गुरुग्राम येथील किंग्डम ऑफ ड्रीम्समध्ये ब्युटी पेजेन्ट डियाडेम मिस इंडिया आणि मिसेस इंडिया लिगेसी 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातून 25 तरुणी सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत ऋतूजाने उपविजेतेपदाचा मान मिळवला. (हेही वाचा - Femina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण? जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल)

उपविजेतेपद मिळवल्यानंतर ऋतुजाने टीव्ही 9 या मराठी चॅनेलला प्रतिक्रिया देताना सांगितलं की, डियाडेम मिस इंडिया स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकात येईल याची कल्पना नव्हती. या यशामुळे मला खूप आनंद झाला असून राष्ट्रीय पातळीवर मला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला मिळालं याचा मला अभिमान आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव नेण्याचा प्रयत्न करील, असंही ऋतूजा यावेळी म्हणाली.

2019 मध्ये भारतीय वंशाच्या डॉक्टर तरुणीने ‘मिस इंग्लंड’चा (Miss England) मुकूट पटकावला होता. भाषा मुखर्जी (Bhasha Mukherjee) असं या तरुणीचं नाव होतं. भाषाने युनिवर्सिटी ऑफ नॉटिंगहममधून वैद्यकशास्त्र आणि औषध व शस्त्रक्रिया अशा दोन विषयात बॅचलर्स डिग्री मिळवली आहे.