महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शेअर  केलं 'कॉंग्रेस लय भारी' प्रचारगीत (Watch Video)
Maharashtra Congress (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता सारेच पक्ष कामाला लागले आहेत. सार्‍याच पक्षांचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेली ही रणधुमाळी आता अंतिम टप्प्यांत पोहचली आहे. आज कॉंग्रेस पक्षाकडून 'लय भारी' हे प्रचारगीत लॉन्च करण्यात आलं आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे.

महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूक 2019 साठी 288 मतदार संघामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी होणार आहे. आज राहुल गांधी महाराष्ट्र दौर्‍यावर असून वर्धा आणि यवतमाळ मध्ये सभा घेणार आहेत. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची यवतमाळ, आर्वी येथील सभांचं वेळापत्रक.  

कॉंग्रेस पक्षाचे प्रचारगीत

2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला 42 जागा जिंकता आल्या होत्या. सध्या महाराष्ट्रासह देशात कॉग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. यामध्ये शिवसेना- भाजपा युतीला यश आलं होतं. त्यांनी सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं होतं.