महाराष्ट्रामध्ये येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान होणार आहे. यासाठी सारेच पक्ष कामाला लागले आहेत. मात्र ज्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांच्यापैकी काहींनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये बंडखोरी करणार्या चार जणांची हाकलपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये चरण वाघमारे, गीता जैन, बाळासाहेब ओव्हाळ आणि दिलीप देशमुख यांचा समावेश आहे. तर संतोष जनाठे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचं भारतीय जनता पक्षाने सांगितले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी शिवसेना- भाजपा, रिपाई आणि इतर अशी महायुती करण्यात आली आहे. 288 विधानसभा जागंवर होणार्या मतदाना साठी भाजपा 150,शिवसेना 124 तर इतर 14 जागांवर महायुतीचे जागावाटप झाले आहे. मात्र यामध्ये नाराज काही भाजपा कार्यकर्त्यांनी बंडाचं निशाण फडकवल्याने त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.
महाराष्ट्र भाजपामधून हाकलपट्टी केलेले उमेदवार कोण ?
चरण वाघमारे - तुमसर
गीता जैन - मीरा भायंदर
बाळासाहेब ओव्हाळ - पिंपरी चिंचवड
दिलीप देशमुख - अहमदपूर, लातूर
संतोष जनाठे - पालघर जिल्हा सरचिटणीस म्हणून राजीनामा
महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान एकाच टप्प्यात राज्यभर पार पडणार आहे. 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.