![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/03/exam-stress-784x441-380x214.jpg)
National Talent Search Examination 2019 : महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS Exam 2019 ) लोकसभेच्या तारखेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यस्तरावर नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये राज्यस्तरावर निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा 12 मे दिवशी होणार होती. मात्र यंदा देशासह महाराष्ट्रामध्ये 17व्या लोकसभा निवडणूकीचा (Lok Sabha Election 2019) कार्यक्रम 11 एप्रिल ते 19 मे 2019 या काळात नियोजित असल्याने परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील प्रज्ञा शोध परीक्षा 16 जून दिवशी घेतली जाणार आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2019 वेळापत्रक
राष्ट्रीय स्तरावर परीक्षा - 16 जून 2019
प्रवेश पत्र मिळण्याची तारीख - एप्रिल महिन्याचा पहिला / दुसरा आठवडा
कुठे मिळेल? - http://www.ncert.nic.in
एका परिपत्रकाच्या माध्यमातून प्रज्ञाशोध परिक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. लोकसभेच्या तारखा आणि परीक्षा एकाच काळात येत असल्याने हे बदल करण्यात आले आहेत. The National Council of Educational Research and Training द्वारा ही परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्येही बदल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक 2019: मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या 75 परीक्षा; 27 परीक्षांच्या वेळपत्रकात बदल
11,18,23 आणि 29 एप्रिल यादिवशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.