नागपूर-भंडारा महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू , 11 प्रवासी गंभीर जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

नागपूर-भंडारा महामार्गावर (Nagpur-Bhandara Highway) शनिवारी पहाटे 5.15 च्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला.

नागपूरहून भंडारा येथे लग्नासाठी जाणारी ट्रॅव्हल्स नागपूर-भंडारा महामार्गावरील रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. शिंगोरी गावाजवळ पहाटेच्या सुमारस ही घटना घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला झाला. तसेत दोघांचा भंडारा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. करुणा खोंडे, आनंद आठवले, सतीश जांभूळकर व विठाबाई झिलपे, असे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. (हेही वाचा - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 3 जण गंभीर जखमी)

राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2019 या एक वर्षाच्या कालावधीत 32 हजार 876 रस्ते अपघात झाले. यात 12 हजार 565 जणांचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी अपघातात 10 टक्के घट होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईमध्ये 2019 मध्ये सर्वाधिक 2 हजार 856 अपघात झाले. या अपघातात 405 जणांचा मृत्यू झाला.