Holika Dahan 2025 In Worli BDD Chawl: मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत यंदा अनोखी होळी पेटणार! 50 फूट उंचीचा टोरेस घोटाळ्याच्या पुतळ्याचे करण्यात येणार दहन (Watch Video)
शर्ट-इन केलेल्या या पुतळ्याच्या तळहातावर हिरा ठेवला असून त्याच्या बाजूला नोटा पसरलेल्या आहेत. बीडीडी चाळीतील नागरिक आज या पुतळ्याचं दहन करून होळीचा उत्सव साजरा करणार आहेत.
Holika Dahan 2025 In Worli BDD Chawl: आज संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. आज रात्री शुभ मुहूर्तावर होळी (Holi 2025) पेटवण्यात येईल. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ (Worli BDD Chawl) येथील रहिवाशांनी टोरेस दागिने गुंतवणूक घोटाळ्यातील पीडितांना न्याय मिळावा यासाठी 'टोरेस घोटाळा'चा 50 फूट उंचीचा पुतळा (Effigy of the Torres Scam) तयार केला आहे. शर्ट-इन केलेल्या या पुतळ्याच्या तळहातावर हिरा ठेवला असून त्याच्या बाजूला नोटा पसरलेल्या आहेत. बीडीडी चाळीतील नागरिक आज या पुतळ्याचं दहन करून होळीचा उत्सव साजरा करणार आहेत.
टोरेस ज्वेलरी पोंझी घोटाळा -
13 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेस ज्वेलर्सच्या संचालक आणि सीईओंविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. नरिमन पॉइंट येथील एका भाजी विक्रेत्याने दाखल केलेल्या तक्रारीमुळे कंपनीच्या दादर कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी जमली होती. मुंबईतील शेकडो लोकांना गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणाऱ्या पॉन्झी घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून एका महिलेसह दोन युक्रेनियन नागरिकांची ओळख पटली आहे. (हेही वाचा: Torres Jewellery Scam: गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील हजारो लोकांची फसवणूक; गुंतवणूकदारांचा टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ)
पहा व्हिडिओ -
टोरेस दागिने घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने युक्रेनियन नागरिक आर्टेम आणि ओलेना स्टोइन यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले होते. रत्ने, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीवर लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कसे आकर्षित करता येईल याचा कट रचण्यात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Torres Company Scam: मुंबईत टॉरेस ज्वेलरी कंपनीद्वारे तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटींची फसवणूक; तीन जणांना अटक, सूत्रधार युक्रेनला पळाले, प्रकरण EOW कडे हस्तांतरित)
प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेली ही कंपनी 2023 मध्ये नोंदणीकृत झाली. 2024 मध्ये दादरमध्ये तिने एक मोठे आउटलेट उघडले आणि त्यानंतर मीरा-भाईंदरसह इतर ठिकाणी विस्तार केला. टोरेस ज्वेलरीने ग्राहकांना सोने, चांदी आणि मोइसनाइट खरेदीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)