Snake: चालत्या गाडीच्या बोनेटवर अचानक आढळला साप, चालकाने प्रसंगावधान राखत 'अशी' केली सुटका
Sand Boa Snake | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापाचा सर्वत्र वावर पहायला मिळतो. अनेक वेळा हे साप गाड्यांमध्ये जाऊन बसतात. मात्र जेव्हा हे गाडी मालकाच्या नजरेस पडतं. तेव्हा त्याची अगदीच भांबेरी ऊडून जाते. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतीच नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली आहे. अन् यावेळी साप एखाद्या गाडीमध्ये न जाता चक्क चालत्या गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास करत होता. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

नाशिकचे रहिवाशी रत्नदिप त्यांच्या कुटूंबासह त्यांच्या खाजगी वाहनाने प्रवास करत होते. त्यावेळी गाडी चालवताना त्यांचे लक्ष गाडीच्या बोनेटवरील डाव्या बाजूला गेलं. तिथे त्यांना साप असल्याचे दिसून आले. आता साप म्हटल्यावर सगळ्यांच घाम फुटणं हे निश्चितच होणार. मात्र गाडी महामार्गावर असल्या कारणाने मध्येच गाडी थांबवणं त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे या सापाला घेऊनच पुढील 2 किमीपर्यंतचे अंतर त्यांनी पार केले.

या सापासोबतचा खेळ सुमारे दोन तास असाच सुरू होता. रत्नदिप यांनी पोलिसांची मदत घेऊन गाडी एका सर्विस सेंटरच्या रॅम्पवर ऊभी केली. तिथे सर्पमित्राच्या मदतीने हा साप गाडीवरून बाहेर काढण्यात आला. यानंतर त्या सापाला जंगलात सोडण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ रत्नदिप यांच्या कुटूंबाने काढला. अशा थरारक प्रसंगी रत्नदिप यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानचे सोशल मीडियावर कौतूक होताना दिसत आहे.