एअर इंडियाच्या Lagos to Mumbai विमानाने प्रवास करणाऱ्या एका 42 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

एअर इंडियाच्या (Air India) विमानाने लागोस ते मुंबई  (Lagos to Mumbai) दरम्यान प्रवास करणाऱ्या एका 42 वर्षीय पुरुष प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या प्रवाश्याला ताप आणि छातीत दुखत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रविवारी सकाळी घडल्याची माहिती देण्यात येत आहे. एअर इंडियाचे विमान पहाटे 3.30 वाजता लॅंड झाल्याचे सांगण्यात आले असून मंगेश पाटील असे व्यक्तीचे नाव आहे.मंगेश पाटील यांचा मृतदेह कुपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.(मुंबई: दादर मधील इमारतीच्या कड्यावरून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, Watch Video)

पाटील यांना मलेरियामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विमान लँन्ड झाल्यानंतर घटनास्थळी डॉक्टरांचे पथक सुद्धा उपचारासाठी पोहचले होते. परंतु डॉक्टरांचे उपचार मिळण्यापूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.(ठाणे येथील घोडबंदर रोडवर कार झाडाला आदळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 3 जण जखमी)

दरम्यान, पहाटे 2 वाजताच्या सुमारास एअर इंडियाच्या पायलटांनी मुंबईतील विमानतळाशी संपर्क साधत लँन्डिंगनंतर तातडीची वैद्यकिय गरज असल्याचे त्यांना सांगितले होते. प्रवासी 31C येथे बसले होते आणि त्यांना मलेरियाचा ताप येत असल्याचे क्रू मेंबर्सनी सांगितले. मृत्यू होण्यापूर्वी पाटील यांना थंडी वाजण्यासह त्यांचे अंग थरथरत असल्याचे ही म्हटले आहे. तर विमानात असलेल्या डॉक्टर तुषार राणे हे पाटील आणि क्रु मेंबर्स पाटील यांची अवस्था पाहून मदतीसाठी पुढे आले पण अखेर त्यांचा मृत्यू झाला.